
डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री प्रतिष्ठाण संघटनेचे कार्य कौतुकास्पद
प्रतिनिधी —सचिन रणदिवे
देशासह राज्यामध्ये कोरोना व्हायरसने हैदोस घातलेला असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन व संचारबंदी केली असल्याने सर्व सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांनी सामाजिक कार्य म्हणून अन्नदान करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे,त्यामुळे मैत्री प्रतिष्ठाण संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समाजामध्ये कौतुक केले जाते आहे.अनेक गोरगरीब जनतेच्या मुखामध्ये अन्न घातल्याने अनेकानी त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनो या रोगाने संपूर्ण महाराष्ट्रात नाकाबंदी संचारबंदी संपूर्ण भारत बंद करून टाकला आहे.पण या काळात तहान भुकेने व्याकूळ झालेल्या दमलेला भेदरलेल्या त्या गरीब कुटुंबांचं काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर उद्भवत आहे? सरकारही योग्य निर्णय घेत आहे पण त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येत नाही,असे मत मैत्री प्रतिष्ठाण चे अध्यक्ष महेश शिंदे-पाटील यांनी व्यक्त केले. स्वतःला तत्त्वज्ञानही मानणारे काही लोक आज घराच्या घरट्यात दरवाजा बंद करून बसले आहेत. मग त्या गरीब कुटुंबांचे काय ? ज्यांना काम केल्यावरच एका वेळेचे जेवण मिळेल अशा कुटुंबांना जेवणाची सोय होणार कुठून हाच मुद्दा लक्षात घेऊन मैत्री प्रतिष्ठान या सामाजिक संघटना ने अकलूज, वेळापूर, माळशिरस, पिलीव, सांगली, येथे सामाजिक सेवा म्हणून अन्नदान करण्याचा एक छोटासा उपक्रम करत आहोत.आणि हा उपक्रम आम्ही स्व-खर्चावर करत आहोत.मैत्री प्रतिष्ठान एक सामाजिक संघटना असे अनेक उपक्रम करत असते.अशी माहिती मैत्री प्रतिष्ठाण संघटनेचे अध्यक्ष महेश शिंदे पाटील यांनी दिली.