
किरण साठे यांच्या प्रयत्नामुळे अकलूजमधील खाजगी रुग्णालये सुरळीतपणे चालू —सचिन मोरे
प्रतिनिधी—अकलूज
विभागीय आयुक्त व सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील खाजगी रुग्णालये चालू ठेवण्याचे आदेश दिले होते,तसेच रुग्णाला सेवा नाकरल्यास रुग्णालयाचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले होते,मात्र तरीही संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालये बंदच होती. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रुग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टर यांच्यावर कारवाई करून संबंधित बंद असलेल्या दवाखाण्याची नोंदणी कायमची रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस अकलूज यांच्याकडे केली होती त्यानंतर त्वरित माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांनी ग्रामस्तरीय समितीला या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व रूग्णांना सेवा न देणाऱ्या रुग्णालयाचे अहवाल व माहिती देण्याचे आदेश काढताच माळशिरस तालुक्यासह अकलूजमधील बंद असलेली संबंधित रुग्णालये चालू करण्यात आली.अशी माहिती सचिन मोरे यांनी दिली,
माळशिरस तालुक्यातील अकलूज हे गाव रुग्णालयाच्या बाबतीत नामांकित असल्याने किरण साठे यांनी ही मागणी रेटून व लावून धरली होती त्याच्यामुळे च अकलूजमधील रुग्णालये उघडी असून या खाजगी रुग्णालयात रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू आहे,हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या प्रयत्नामुळे सुरळीत चालू झाली असल्याचे बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष सचिन मोरे यांनी सांगितले.