
ॲड सोमनाथ आण्णा वाघमोडे मित्र मंडळाच्या वतीने गरजू लोकांना अन्नधान्य वाटप
प्रतिनिधी–माळशिरस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस शहरांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत सोमनाथ आण्णा वाघमोडे मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले माळशिरस शहरांमध्ये गोर गरीब राहणाऱ्या लोकांसाठी खंडकरी शेतकऱ्यांचे नेते व फलटण पंढरपूर रेल्वे चे जनक अॅड सोमनाथ अण्णा वाघमोडे मित्र मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मा श्री राजगुरू साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज, मा श्री विश्वंभर गोल्डे पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस स्टेशन, मा श्री वडजे साहेब मुख्यकार्यकारी माळशिरस नगरपंचायत, तसेच पी एस आय शेळके साहेब, यांच्या हस्ते गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य वाटप करण्यात आले

तसेच यावेळी देवबाप्पा (माय), कैलास इंगळे,ॲड महेश काळे, कैलास पवार, धनंजय पालवे, नवनाथ काळे व इतर परिसरातील नागरीक उपस्थित होते. हा कार्यक्रम मस्कोबा मंदिरा जवळ सौ.नुतनताई सोमनाथ वाघमोडे नगरसेविका माळशिरस नगरपंचायत वार्ड क्रमांक 13 मध्ये संपन्न झाला.